तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? हे आहेत खाण्याचे फायदे
लाइफफंडा

तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? हे आहेत खाण्याचे फायदे

तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? नसेल तर नक्की खा, कारण नाचणीची भाकर खाण्याचे असंख्य फायदे आहेत आणि साधारणपणे आपल्या घरात ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार कमी वेळा केली जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

नाचणी खाण्याचे फायदे

१) अशक्तपणा दूर होतो.

२) पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.

३) नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.

४) शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

५) शरीरावर फोड आल्यास ते फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे.

६) कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.