एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई
क्रीडा

एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई

सिडनी : एकीकडे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे भारतीय संघावर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी विजय मिळवल्यानंतर षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आयसीसीने कारवाई केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय खेळाडूंच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापून घेतली जाणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी हा निर्णय सूनावला. पहिला एकदिवसीय सामना संपण्यासाठी भारतीय वेळेनुसार जवळपास ६ वाजले होते.

काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही सामना लांबल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्यातील पंच रॉड टकर, सॅम नोगाजस्की आणि तिसरे पंच पॉल रेफेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली. रविवारी दोन्ही संघात दुसरा वन-डे सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या समामन्यात भारतीय खेळाडूंनी सपाटून मार खाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ते कशा प्रकारे कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.