फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये आयफोनसह स्मार्टफोन्सवर मिळताहेत बंपर ऑफर्स
लाइफफंडा

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये आयफोनसह स्मार्टफोन्सवर मिळताहेत बंपर ऑफर्स

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर बंपर सूट आणि काही बेस्ट ऑफर दिल्या जात आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या सेलचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ICICI बँक कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात नवीन फोनसोबत स्वागत करायचे असेल तर या सेलमध्ये कोणत्या फोन्सवर किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घ्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयफोन ११ प्रोवर १० टक्के सूट
फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये आयफोन ११ प्रो वर २० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. म्हणजेच ९९ हजार ९९९ किमतीचा आयफोन ११ प्रो तुम्ही केवळ ७९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. फोनला जर एक्सचेंज ऑफर करीत असाल तर तुम्हाला २६ हजार ६०१ रुपयांचा फायदा मिळू शकतो.

आयफोन 11 प्रो वैशिष्ट्ये
आयफोन 11 प्रो चे डिस्प्ले5.8 इंच आहे. याव्यतिरिक्त, डिस्प्ले सुपर रेटिना एक्सडीआरला सपोर्ट कतो. डिस्प्ले रिजोल्यूशन 2436×1125 पिक्सेल आहे. आयफोन 11 प्रो आयफोन 64 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये ए 13 बायोनिक चिपसेट उपलब्ध आहे. जी फोनची गती वेगवान करते. आयफोन 11 प्रो च्या मागील बाजूस तीन रियर कॅमेरा सेटअप आहेत. ज्यामध्ये नाइट मोडसह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 12 मेगापिक्सल वाइड आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे.

iPhone XR वर डिस्काउंट
या सेलमध्ये आयफोनला ३८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत सध्या ४७ हजार ९०० रुपये आहे. फोनला एक्सचेंज ऑफर केल्यास तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

रियलमी एक्स ३रियलमी एक्स ३ सुपर झूम वर मस्त ऑफर
रियलमीचा हा जबरदस्त स्मार्टफोन सेलमध्ये २७ हजार ९९९ रुपयांच्या ऐवजी २३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

पोको आणि रेडमी स्मार्टफोनवर ऑफर
या सेलमध्ये पोको एक्स 3 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत घेता येईल. पोको सी 3 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पोको एक्स 2 स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. पोको एम 2 प्रो 12,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी करता येईल. तर रेडमी 9i 4 जीबी फोन 8,299 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी करण्यास उपलब्ध आहे. रेडमी नोट 8 हँडसेट 1,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.

सॅमसंग स्मार्टफोनवर ऑफर
सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस 54,999 रुपयांमध्ये घेता येईल. गॅलेक्सी A21S फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. गॅलेक्सी A31 हँडसेट 18,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 अनुक्रमे 22,999 आणि 29,499 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहेत.