बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला या घटनेने मोठा हादरा बसला आहे. रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर रात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचं माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते एक शांत आणि सभ्य नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झालं आहे, अशा शब्दात देवगौडा यांनी शोक व्यक्त केला आहे.
ವಿಧಾನಪರಿಷತ್ ಉಪಸಭಾಪತಿ ಹಾಗೂ @JanataDal_S ಮುಖಂಡರಾದ ಎಸ್.ಎಲ್. ಧರ್ಮೇಗೌಡರು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿ ಆಘಾತವಾಗಿದೆ. ಸಜ್ಜನ, ಸನ್ನಡತೆಯ ಉಪಸಭಾಪತಿಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡದ್ದು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಷ್ಟ. ಅವರ ಕುಟುಂಬ ಹಾಗೂ ಬಂಧುಮಿತ್ರರಿಗೆ ಈ ನೋವು ಭರಿಸುವ ಶಕ್ತಿ ಭಗವಂತ ನೀಡಲಿ.
— H D Deve Gowda (@H_D_Devegowda) December 29, 2020
६४ वर्षीय धर्मगौडा हे अलिकडेच चर्चेत आले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं. बेकायदेशीरपणे सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.