रविवारी घेणार होते खासदारपदाची शपथ; पण, आधीच झाले कोरोनामुळे निधन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

रविवारी घेणार होते खासदारपदाची शपथ; पण, आधीच झाले कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाने अक्षहरशः थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं त्यांचं नाव होतं. रविवारी ते खासदार पदाची शपथ घेणार होते. ते केवळ ४१ वर्षाचे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

18 डिसेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ल्यूक जोशुआ लेटलो यांना कोरोनाची लागण झल्याचं कळताचं राहत्या घरी आयसोलेट करण्यात आलं. मात्र १९ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन मुलं आहेत. लेटलो अमेरिकेतील राजकारणातले उच्च नेते होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून तो कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. अनेकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. शिवाय कोरोना या धोकादायक विषाणूमुळे सर्वच देशांची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे.