अग्नितांडवात २५ दुकाने जाळून खाक; कोंबड्या आणि बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
पुणे बातमी

अग्नितांडवात २५ दुकाने जाळून खाक; कोंबड्या आणि बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली. या अग्नितांडवात मार्केटमधील चिकन आणि मासे विक्त्रेत्यांची दुकाने जाळून खाक झाली. त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्याची माहिती मिळाली. या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, दलाने काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होतं.

या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकाने जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून, ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. दुर्दैवाने दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्यांचा मात्र आगीत जळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.