बातमी मुंबई

मुंबई पोलिसांचा शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज (ता. २३) मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राजची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यासंदर्भातील वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचे सहकारी रायन तोरपेला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे या दोघांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनंती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.