‘ते’ वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
देश बातमी

‘ते’ वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या आहेत, अशा आशयाचे एक वृत्त सोशल मिडीयावर वेगाने पसरत आहे. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने वृत्त तथ्यांवर आधारित नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
“सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारं वृत्त दिशाभूल करणारं असून तथ्यांवर आधारित नाहीये.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोशल मीडियामध्ये चुकीच्या न्यूज क्लिप प्रसारित केल्या जात आहेत. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून चुकीच्या संदर्भासह तो व्हायरल होत आहे”, असे रेल्वे मंत्रालयाने एका निवेदना द्वारे स्पष्ट केले आहे. तर, “ट्रेन रद्द केल्याचं वृत्त जुनं आहे, भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. जुनी बातमी चुकीच्या संदर्भासह शेअर केली जात आहे”, असे स्पष्टीकरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द केल्याचं वृत्त खोटं असून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालं आहे.

त्याचबरोबर, “काही माध्यमांच्या वृत्तानुसार असा दावा केला जात आहे की, ट्रेनमध्ये झोपून प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे 10% अतिरिक्त भाडे आकारण्याची शक्यता आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. अशाप्रकारची फक्त सूचना रेल्वे मंडळाला देण्यात आली होती. पण रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही”, असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.