मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…
राजकारण

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्त्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात लॉकडाऊन तर काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सर्वत्ती करत निशाणा साधला आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संदीप देशपांडे यांनी ट्वीटच्या माध्यमांतून ठाकरे सरकारला प्रश्न विचारले आहेत. ”’महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?’, असे प्रश्न देशपांडेंनी ट्विट करून विचारले आहेत.

तसेच, तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेनं राज्य सरकारवर केली आहे. सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेने विधाराला आहे.

रुग्ण संख्या कमी झाल्यावर आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न अन्… कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी पॅटर्न’चं कौतुक करायचं आणि रुग्ण संख्या वाढल्यावर लोकांना बेजबाबदार म्हणायचं, अशा शब्दांत मनसेकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला.

तसेच, सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवायचं काम करत आहे. लोकांनी कामं करायची नाहीत का?, असा प्रश्न मनसेनं सरकारला विचारला आहे. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची नाहक भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून अनेकदा करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मास्क वापरणार नसल्याची भूमिका घेतली आहे.