देशातील परिस्थिती गंभीर; आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील परिस्थिती गंभीर; आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गुरूवारी एकूण १ लाख ३१ हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल १० लाखांजवळ पोहोचला आहे. सध्या हा आकडा ९ लाख ७४ लाख झाला आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात दिसत असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण होत आहे. गुरूवारीही महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७ हजार ५०० रुग्णांची भर पडली. दिल्ली-महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान लस महोत्सव आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.