अंबाजोगाईच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
बातमी विदेश

अंबाजोगाईच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

अंबाजोगाई : अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील असणाऱ्या या दांपत्याची मुलगी बाल्कनीत एकटी उभी राहून रडत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं असता ही घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बालाजी भारत रुद्रवार (३२) आणि आरती बालाजी रुद्रवार (३०) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. भारत यांनी आरती यांच्यावर लिव्हिंग रुममध्ये चाकूने हल्ला केला. आरती यांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नसल्याचे सांगण्यात येत आहे. बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार माझी नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन पाहिलं असता मृतदेह आढळले. वैद्यकीय तपासणीत चाकूने भोसकलं असल्याचं समोर आलं असल्याचं रिपोर्टमध्ये आहे.

स्थानिक पोलिसांनी नंतर मला घटनेबद्दल माहिती दिली. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी मला शवविच्छेदन अहवालातील माहिती देऊ असं सांगितलं आहे, असं भारत रुद्रवार यांनी सांगितलं आहे. माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही त्यांच्या घरी गेलो होता. पुन्हा एकदा अमेरिकेला जाऊन त्यांना भेटण्याबद्दल विचार सुरु होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील आहेत. कामाच्या निमित्ताने ऑगस्ट २०१५ मध्ये ते पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.