राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री पुढील दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लोकांमधूनच 100 टक्के सर्व बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील. केंद्र सरकारकडून मदत पुर्नवसनाचे 1600 कोटी येणे अपेक्षित आहे, परंतू अद्याप ते आलेले नाही. कदाचित पुढील काही दिवसात येतील, अशी अपेक्षा आहे. दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला असून त्याबाबत माहिती मागितली आहे. त्यानतंर महाराष्ट्रातही कदाचित लॉकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येईल. राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचा हवा तितका फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर काही राज्यांनी आठवडी लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यभरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. कोरोनाचा आकडा वाढत असल्यानेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.