प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात
मनोरंजन

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात

चेन्नई : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. हैद्राबादच्या केबल ब्रीजवर झालेल्या अपघातात हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेज आपली स्पोर्ट्स बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचा अपघाता झाला. सध्या तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. अभिनेता पवन कल्याण, चिरंजीवी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी सांगितले, की तेजला अपोलो रुग्णालयात हलवले जाईल.

https://twitter.com/MaheshBabuFansG/status/1436367711659986947

साई धरम तेज हा सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो आणि अनेकदा तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. काही महिन्यांपूर्वी, त्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी आस्क मी एनीथिंग सत्रासह संवाद साधला होता.