सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी
मनोरंजन

सलमान-कतरिना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ चित्रपटाची सुरु झाली तयारी

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच या जोडीनं ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरवला होता. आता ही जोडी टायगर-3 या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टायगर-3 हा सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा नववा चित्रपट असेल. या चित्रपटाचं काम सुरू झालं असून शुटिंगची तारीखही समोर आली आहे. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि कतरिना मार्च 2021 पासून ‘टायगर 3’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईत होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. तर यानंतरचं उर्वरित शूटिंग मध्य पूर्व (आखाती राष्ट्र) देशांत केलं जाणार आहे. एवढंच नाही तर या आगामी चित्रपटात तुम्हाला शाहरुख खान देखील दिसणार आहे. चित्रपटातील एका खास सिनमध्ये शाहरुख खान दिसेल.

टायगर फ्रेंचायझीच्या या चित्रपटाचं बजेटही खूप जास्त असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं बजेट ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप जास्त असेल. दरम्यान या चित्रपटाचं नाव तेच ठेवलं जाईल की नाही, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कदाचित या चित्रपटाचं नावही बदललं जाऊ शकतं. शिवाय यश राज फिल्म या चित्रपटाच्या खलनायकासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.