मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून
बातमी मराठवाडा

मराठवाडा हादरला! ऐन गणेशोत्सवात भर दिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

नांदेड : गणेशोत्सवात नांदेडमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला. भर दिवसा एका १७ वर्षाच्या युवकाचा चाकुने भोसकून खुन करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाची हत्या करण्यात आली असून एक युवक जखमी झाला आहे. ही घटना आज हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरात घडली. यश मिरासे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. हत्या झालेल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हत्येच्या या घटनेमुळे हिमायतनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांना जमलेली गर्दी पांगवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. खुनाची घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी तरुणावर हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका कुटूंबियांनी घेतली आहे.