बीएसएनएल’ने बदलला वार्षिक प्लान; आता ३ जीबी ऐवजी मिळणार फक्त २ जिबी
मनोरंजन

बीएसएनएल’ने बदलला वार्षिक प्लान; आता ३ जीबी ऐवजी मिळणार फक्त २ जिबी

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमधील डेटा बेनिफिटमध्ये बदल केला आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये आता ३ जीबी ऐवजी २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. ही ऑफर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीएसएनएलच्या १९९९ रुपयांच्या प्लानमधील बदल १ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. कंपनीच्या या प्लानला सध्या १ दिवसांची जास्त वैधता मिळते. तसेच, प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळणार आहे. दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कवर सुद्धा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

बीएसएनएलने पीव्ही १९९९ साठी मल्टिपल रिचार्जची सुविधा १ फेब्रुवारी पासून परत घेण्याची घोषणा केली आहे. सध्या या प्लानमध्ये कंपनी २१ दिवसांची वैधता ऑफर करीत आहे. म्हणजेच आता १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यास ग्राहकांना ३८६ दिवसांची वैधता मिळते. १ फेब्रुवारी पासून रिचार्ज केल्यास ३६५ दिवसांची वैधता मिळणार आहे.

बीएसएनएल युजर्संसाठी २३९९ रुपयांच्या वार्षिक प्लान आहे. या प्लानमध्ये रिपब्लिक डे अंतर्गत ७२ दिवसांसाठी एक्स्ट्रा वैधता ऑफर केली जात आहे. १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानला रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता इरोस नाउचे अनलिमिटेड कॉन्टेंन्टचा फायदा मिळू शकतो. हा फायदा पूर्ण ३६५ दिवसांसाठी असेल. तसेच ६० दिवसांसाठी लोकधून कॉन्टेंट फ्री मिळणार आहे.

डिसेंबर २०२० मध्ये रिविजन आधी १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये लोकधून कॉन्टेंट ३६५ दिवसांसाठी आणि इरोस नाउचे अॅक्सेस ६० दिवसांसाठी मिळत होते. याशिवाय ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड साँग चेंज ऑप्शन सोबत PRBT बेनिफिट मिळत आहे.