विमानप्रवासाला निघालात; थांबा आधी ही बातमी वाचा
कोरोना इम्पॅक्ट

विमानप्रवासाला निघालात; थांबा आधी ही बातमी वाचा

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण संचालनालयाला (DGCA) विमान प्रवासासंबधी काही आदेश दिले आहेत. न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार DGCAनं हनुवटीवर किंवा कोणत्याही चुकीच्या प्रकारे मास्क घातलेले प्रवासी दिसल्यास त्यांना तात्काळ विमानातून बाहेरची वाट दाखवावी, असे आदेश दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर नागरी उड्डाण संचालनालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या माध्यमातून काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर DGCA कडून ट्विटरच्या माध्यमातून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र हे नियम न पाळल्यास प्रवाशांना शिक्षेला समोर जावं लागेल असंही सांगण्यात आले आहे.

सध्या विमानप्रवास करणाऱ्या अशाच प्रवाशांसाठी काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. ज्याचं पालन न केल्यास तुमची विमानातून हकालपट्टीही होऊ शकते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, पण जर कोणीही विमानात योग्य पद्धतीने मास्क वापरताना आढळलं नाही, किंवा तो चुकीच्या पद्धतीने वापरला तर अशा प्रवाशांना शिक्षा म्हणून थेट विमानातूनच उतरवण्यात येणार आहे.

कोरोना देशात शिरकाव होण्याच्या घटनेला जवळपास वर्षभराचा काळ उलटून गेला. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच पुन्हा एकदा या संसर्गानं डोकं वर काढलं जिथे डिसेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच भारतात मार्च महिन्यात रुग्णसंख्या 20 हजारांहूनही अधिकच्या आकड्यानं वाढली. नव्यानं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा हा आकडा पाहता, अनेक भागांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी केंद्रसरकारसह राज्यसरकारेही प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवत आहेत. ज्यामध्ये किंचितसाही हलगर्जीपणा धोक्याच्या दरीत ढकलू शकतो. याच धर्तीवर कोरोनापासून दूर राहण्यासाठी म्हणून प्रशासनाकडून अनेक कठीण निर्बंध लागू करण्यात येत आहेत.