अमिताभ बच्चन म्हणाले, यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही
मनोरंजन

अमिताभ बच्चन म्हणाले, यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या स्टाईलने कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत. 78 वर्षीय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी मजेदार पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मजेदार फोटो कॅप्शनसह शेअर केला असून यात त्यांना सेटवर टॉर्चर केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो मजेदार कॅप्शनसोबत शेअर केला आहे. या फोटोत ते एका हातात रसगुल्ला तर दुसऱ्या हातात गुलाब जामुन घेऊन आहेत. बिग बी यांनी लिहिले की, जेव्हा आपण गोड खाणं सोडलेलं असतं तेव्हा शूटवर तुमच्या हातात रसगुल्ला आणि गुलाब जामुन देऊन सांगितलं जातं की, आत्ताच तुम्ही हे खाल्ल्यासारखं आणि स्वादिष्ट लागल्यासारखं एक्सप्रेशन द्यायचं आहे. यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही.

https://www.instagram.com/p/CI86yWPh5T5/?utm_source=ig_web_copy_link

कधी जुन्या आठवणी तर कधी व्हायरल व्हिडीओ शेअर करत असतात. रील आणि रिअल लाइफचे किस्से शेअर करत असतात. आपल्या कामाबाबत काही अपडेट्सही ते देतात. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ते अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात दिसणार आहेत. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच ते नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ आणि रूमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ सिनेमातही दिसणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना शेवटी शुजित सिरकर यांच्या ‘गुलाबो सीताबो’ या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना दिसले होते होते. यावर्षी जूनमध्ये अमेझॉन प्राइमवर हा चित्रपट रिलीज झाला होता आणि त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.