बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; एकामोगमाग कलाकार कोरोना पॉझिटिव्ह
मनोरंजन

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; एकामोगमाग कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : कोरोनामुळे बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी अनेक दु:खद बातम्या आल्या. दिव्या भटनागरचा कोरोनाशी झुंज देताना तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता, सूत्रसंचालक मनीष पॉललाही कोरोना झाल्याचं समोर आलं. तसंच तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच जुग जुग जियो या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नीतू कपूर आणि वरुण धवन यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तसंच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.

अभिनेत्री कृती सेनॉनचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कृतीच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कृती सेनॉन अखेर अर्जुन कपूर आणि संजय दत्तसोबत ‘पानीपत’ चित्रपटात दिसली होती. कृती सॅनॉन आता ‘मिमी’ चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकरसोबत दिसणार असून त्यामध्ये ती सरोगेट मदरची भूमिका साकारत आहे. याशिवाय कृती सेनॉनचे अक्षय कुमार यांच्यासह ‘बच्चन पांडे’ आणि प्रभाससमवेत ‘आदिपुरुष’ असे मोठे चित्रपट आहेत.