गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली : गतवर्षी ३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ जण कोरोना रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वात पहिला करोना रुग्ण आढळला होता. अशातच दिवाळीमध्ये देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र करोनाचे रुग्णांमध्ये वाढ न होता ती घटत असल्याचे दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ८३६५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतात गेल्या आठ महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे. या पूर्वी १५ जुलैला एका दिवसात ३० हजाराहूंन कमी रुग्णवाढ नोंदवली गेली होती. त्यावेळी नव्या रुग्णांची संख्या २९ हजार ४२९ इतकी नोंदवली गेली होती. मात्र पुढील दोन आठवडे अतिशय महत्वाचे असून तर रुग्णवाढीची गती हीच राहिली, तर आपण योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट होईल.

भारतात १६ जानेवारीपासून भारतातील लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ३९ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने नागरिकांचं लसीकरण केलं जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये सांगितलं होतं.

दरम्यान, एका वर्षात १ कोटी रुग्ण करोनामधून बरे झाले आहेत तर १ लाख ५४ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देशात करोनामुळे ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी १२ मे रोजी सर्वात कमी ८७ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरपासून भारतात करोना रुग्णसंख्या सतत कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत १२,०७७ ची घट झाली आहे. या दरम्यान ४० हजार ७९१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता देशात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८२ लाख ९० हजार ३७१ इतकी झाली आहे. म्हणजेच करोनाचा रुग्ण बरे होण्याचा दर चांगला होत तो ९३.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण रुग्णसंख्येत सक्रिय रुग्णांची संख्या ५.११ टक्के इतकी आहे. मृत्युदराबाबत देखील भारताच्या स्थितीत सुधारणा होत आहे. हा दर आता १.४७ टक्क्यांवर आला आहे.

तसेच, आकडेवारीनुसार, देशात सतत सातव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांच्या खालीच राहिली आहे. भारतात ७ ऑगस्टला करोनबाधितांची संख्या २० लाख, २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ती ४० लाखांच्या पुढे गेली. तर, एकूण रुग्णसंख्या १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला ७० लाख, तसेच २९ ऑक्टोबरला ८० लाखांच्या पुढे गेली होती.