शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
मनोरंजन

शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचं मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी निधन झालं. ते 89 व्या वर्षांचे होते. जवळपास 15 वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोक या आजाराने ग्रस्त होते. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ए.आर. रहमान यांनी शोक व्यक्त केला आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खान यांची सून नम्रता गुप्ता-खान यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. ”उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. माझ्या सासऱ्याचं काही मिनिटांपूर्वीच निधन झालं. आमच्या कुटुंबाचा आधार आणि देशातील लिजंड, पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आज जगाचा निरोप घेतला, असं ट्विट नम्रता यांनी केलं आहे.

1931 मध्ये उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात गुलाम मुस्तफा खान यांचा जन्म झाला. रामपूर-सहसवान घराण्याशी जोडलेले असलेले गायक गुलाम मुस्तफा खान यांनी मृणाल सेन यांचा चर्चित चित्रपट ‘भुवन शोम’मधून आपल्या गायकीच्या करिअरचा प्रारंभ केला होता. भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रात त्यांनी जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे गुलाम मुस्तफा खान यांनी ‘उमराव जान’, ‘आगमन’, ‘बस्ती’, ‘श्रीमान आशिक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या गायकीचा नजराणा प्रेक्षकांसाठी पेश केला. त्यांनी संगीत क्षेत्रातील ‘ज्युनिअर तानसेन’ म्हणून ओळखलं जात असे.

तर, प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान यांनीही खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वात प्रिय शिक्षक…. गफूर उर रहीम तुम्हाला दुसऱ्या दुनियेत विशेष स्थान देवो, अशा शब्दांत रहमानने शोक व्यक्त केला आहे.