ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूरमधील गणेशवाडी ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाला असून ही ग्रा.पं. भाजपाने जिंकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये ही ग्राम पंचायत आहे. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले. चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले होते. उमेदवारांचे गेले दोन दिवस विजयाची गणिते मांडण्यात गेले आहेत.

तर, कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. अत्यंत अटीतटीने निवडणूक झाली असून ३,३०७ जागांसाठी तब्बल ७,६५७ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांसह समर्थकांच्या नजरा आजच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
सर्वसाधारणपणे मोठ्या गावांसाठी सहा टेबलवर मोजणी होणार असून अर्ध्या तासात गावची मतमोजणी पूर्ण होऊ शकते. मात्र गावातून मिरवणूक काढल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे.