फरहान अख्तरचं तुफान; ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

फरहान अख्तरचं तुफान; ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरच्या तुफान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. भाग मिल्खा भाग या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफानच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुफानच्या ट्रेलरमध्ये फरहान अख्तर अज्जू भाईच्या भूमिकेत दिसतं आहे. मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून जाते. अनन्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. यातूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास सुरु होतो.

तुफान या चित्रपटात फरहान, मृणाल यांच्यासोबत परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १६ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.