सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात
मनोरंजन

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. परंतु आता ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायाला मिळाली होती. पण, सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून सुरुवातीलाच ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहे वादाचे कारण?
या सीरिजद्वारे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले आहे. वेब सीरिजच्या एका दृश्यामध्ये मोहम्मद झिशान अयूब नाटकात काम करताना दिसत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान, तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

वेब सीरिजच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित तांडव ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी वेब सीरिजच्या एका दृश्यावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.