अ‍ॅथलेटिक्स सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र
क्रीडा

अ‍ॅथलेटिक्स सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा : भारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ३७ वर्षीय पुनियाने ६३.७० मीटर थाळीफेक करत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सीमाने ऑलिम्पिकसाठीचा ६३.५० मीटरचा पात्रता निकष पार केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सीमाने २००४ अ‍ॅथेन्स, २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सीमा ही भारताची दुसरी थाळीफेकपटू ठरली आहे. याआधी राष्ट्रीय विक्रमवीर कमलप्रीत कौर हिने गेल्या समवारी इंडियन ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ६६.५९ मीटर अशी कामगिरी नोंदवत पात्रता निकष पार केला होता. राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या यादीत नाव असूनही कमलप्रीत मंगळवारी खेळू शकली नाही.

महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत केरळच्या अंजली पी. डी. हिने २४.०१ सेकंदासह सुवर्णपदक प्राप्त केले. श्रीलंकेच्या जयामाने हिने रौप्यपदक तर तेलंगणाच्या हरिका देवीने कांस्यपदक पटकावले.