अभिनेत्रीचा भररस्त्यात विनयभंग; चार जणांना अटक
मनोरंजन

अभिनेत्रीचा भररस्त्यात विनयभंग; चार जणांना अटक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्राची तेहलानसोबत चार युवकांनी गैरवर्तन केले आहे. दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात ही घटना घडली आहे. प्राचीने यासंदर्भात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली असून त्या चार युवकांना अटक करण्यात आली आहे. लोकप्रिय मालिका दीया और बाती हममध्ये प्राची तेहलान काम करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. अभिनेत्री प्राची तेहलानने चार युवकांविरोधात दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या युवकांनी १ फेब्रुवारीला रात्री रोहणी परिसरात प्राचीसोबत गैरवर्तन केले असे एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्राची पतीसोबत दिल्लीमधील रोहणी सेक्टर १४मध्ये राहते. ती १ फेब्रुवारी रोजी पतीसोबत घरी परतत असताना रस्त्यात काही युवकांना पत्ता विचारला होता. पण त्यांनी पत्ता सांगण्याऐवजी शिवीगाळ केला. त्यानंतर ४ युवकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी प्राचीच्या गाडीला ओव्हर टेक केला. प्राची आणि तिचा पती जीव मुठीत घेऊन सोसायटीपर्यंत पोहोचले. ते युवक प्राचीच्या सोसायटीमध्ये देखील पोहोचले. त्यांनी प्राचीची छेड काढली. प्राची आणि तिचा पती तेथून निसटले. पण ते युवक प्राचीच्या घरापर्यंत येऊन पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या ४ युवकांना अटक केली.