पहिल्याच सीरिजसाठी हृतिकने आकारले तब्बल एवढे कोटी रुपये मानधन?
मनोरंजन

पहिल्याच सीरिजसाठी हृतिकने आकारले तब्बल एवढे कोटी रुपये मानधन?

मुंबई : द नाईट मिरर या ब्रिटीश टीव्ही मालिकेच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक झळकणार असून त्याने या सीरिजसाठी थक्क करणारं मानधन घेतलं आहे. द नाईट मिरर या ब्रिटीश टीव्ही मालिकेच्या हिंदी रिमेक डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजसाठी हृतिकने तब्बल ७५ ते ८० कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या हृतिकच्या मानधनाविषयी केवळ चर्चा सुरु आहेत. मात्र, त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून मोठा पडदा गाजवल्यानंतर हृतिक पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये हृतिक एका एजेंटची भूमिका साकारणार असून या सीरिजचं चित्रीकरण पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये मार्चमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच तो विक्रम वेधा या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही झळकणार आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि अभिनयासोबतच त्यांच्या भल्या मोठ्या मानधनासाठीही ओळखले जातात. यात अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान व हृतिक रोशन यांच्या मानधनाची कायमच चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे सध्या अभिनेता हृतिक रोशन या माध्यमातून चर्चेत आला आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.