बिगबॉसच्या घरात राखी सावंतचा धुमधडाका सुरूच; आता पडलीये रुबिना दिलैकच्या नवऱ्याच्या प्रेमात
मनोरंजन

बिगबॉसच्या घरात राखी सावंतचा धुमधडाका सुरूच; आता पडलीये रुबिना दिलैकच्या नवऱ्याच्या प्रेमात

जेव्हापासून अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे तेव्हापासून तिने या कार्यक्रमात खूपच रंगत आणली आहे. राखीची एन्ट्री झाल्यापासून ती सलमान खानचीही आवडती स्पर्धकही राखी झाली आहे. राखी नेहमीच काहीतरी नवं करत राहते, ज्यामुळे ती प्रेक्षकांना खूप आवडते. कधी ज्युलीचा आत्मा तिच्यात येतो, कधीकधी ती भावनिक होते. आता राखी बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाच्या प्रेमात पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे राखीला तिच्या पतीची आठवण येते, दुसरीकडे ती एखाद्याच्या प्रेमात वेडी झाली आहे. खरतर राखी सावंत रुबीना दिलेकचा पती अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडली आहे. खुद्द राखीनेच याबाबत बिग बॉसमध्ये खुलासा केला आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनव शुक्ला तिला कसा आवडू लागला याबाबत राखी बिग बॉसला सांगत आहे.

शोशी संबंधित प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये बसलेली दिसत आहे. राखी इथे बरीच सुंदर दिसत आहे. कन्फेशन रूममध्ये बसून राखी बिग बॉसला ओरडून सांगते, ‘माझा नवरा सर्वांसमोर यावा अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मी इतर मुलींचे पती पाहते तेव्हा मला कसेतरी होते. मग मी रुबीनाचा नवरा चोरु का ? तो खुपच हॉट आहे.

राखी इथेही थांबत नाही आणि ती पुढे म्हणते की, ‘बिग बॉस, मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला कुणी आवडत असेल तर ते आवडणे चुकीचे नाही ना?’ यावर बिग बॉसही, राखीला ‘नाही, मुळीच नाही’ असे उत्तर देतो. ‘मग मी अभिनला आय लव्ह यु बोलू का ?’ असा प्रश्न राखी बिग बॉस ला करते.

इतकेच नव्हे तर आता राखी तिचा नवऱ्याला म्हणजेच रितेशला घटस्फोट देण्यासही तयार आहे. बिग बॉसशी बोलताना राखी असेही सांगते की, आतापर्यंत रुबीना अभिनवसाठी भांडत असे, आतापासून तीही अभिनवसाठी भांडणार. यानंतर राखी स्वत: ला अभिनवची मैत्रीणही म्हणते. ही शॉर्ट क्लिप पाहून लोकांना खूप मजा येते. संपूर्ण भाग प्रेक्षकांसाठी खूपच पाहण्यासारखा असणार आहे.