हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…
मनोरंजन

हॅपी बर्थडे सलमान खान : सलमानच्या प्रेमात ती फ्लोरिडाहून भारतात आली, पण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकेच तो त्याच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत असतो. सलमान खान आजही अविवाहित आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्रींशी त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र सलमानखानच्या प्रेमात एक अभिनेत्री इतकी वेडी होती कि तिने अद्यापही लग्न केलेलं नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही अभिनेत्री आहे सोमी अली. सोमी मुळची पाकिस्तानची. सोमीचे वडील पाकिस्तानि तर आई इराकची होती. सोमीचा जन्म पाकिस्तानात झाला. त्यानंतर ती आपल्या आई वडिलांसह फ्लोलिडाला रहायला गेली. ऐन तारुण्यात सोमीने ‘मैनें प्यार किया’ सिनेमातच सलमान खानला पाहिलं आणि त्याच्याशीच लग्न करण्यासाठी तिने थेट मुंबई गाठली.

वयाच्या 16 व्या वर्षीच ती मुंबईत आली होती. सलमानच्या ‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील अभिनयामुळे ती सलमानवर भारावून गेली होती. मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रचंड कष्ट करुन तिने एका बॉलिवूडमधील सिनेमामध्ये काम मिळवलं आणि अखेर एके दिवशी तिची आणि सलमान खानची भेट झाली. या भेटीमुळे सोमा अतिशय भारावून गेली होती.

सलमान खान आणि सोमी अली रिलेशनशीपमध्ये आले. 1991 ते 1997 या काळात ते दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांनंतर ते दोघंही वेगळे झाले आणि त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरली ऐश्वर्या. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर काही काळातच तिने बॉलिवूडलाही रामराम ठोकत पुढच्या शिक्षणासाठी ती पुन्हा अमेरिकेत निघून गेली. सलमान आणि सोमी आता एकत्र नसले तरीही ती अजूनही अविवाहित आहे. ते दोघं आपआपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. पण तिने अजूनही लग्न केलं नाही.

एकेकाळी हिंदी सिनेमाची नायिका सोमी अली आता फ्लोरिडामध्ये ‘नो मोअर टियर्स’ नावाची एक एनजीओ चालविते. याव्यतिरिक्त, ती घरगुती हिंसाचार आणि बलात्कार पीडितांसाठी देखील कार्य करते. सोशल मीडियावर त्याचे अकाऊंट नसले तरीही त्यांची छायाचित्रे व्हायरल होतच असतात.

वास्तविक सोमी अली सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. सलमानला सोमीशी लग्न करायचं होतं, पण काही कारणांमुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही. एका मुलाखती दरम्यान सोमीने सांगितले होते की सलमानचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट पाहिल्यावर ती त्याच्यासाठी इतकी वेडी झाली होती की तिने त्या रात्रीच भारतात जाण्याचा निर्णय घेतला.

एका जुन्या मुलाखतीत सोमी म्हणाली की सलमान तिचा पहिला प्रियकर होता. पण ऐश्वर्या राय मध्ये आल्याने त्यांचे नाते टिकू शकले नाही. मी किशोरावस्थेत असताना सलमानवर माझा क्रश होता. या क्रशने मला फ्लोरिडाहून भारतात आणले. केवळ सलमानसोबत लग्न करण्यासाठीच मी सिनेमांमध्ये आले. असेही तिने सांगितले होते.