प्रसिद्ध अभिनेत्रीने केला लिंगबदल; पत्नीसाठी झाली पुरुष
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला लिंगबदल; पत्नीसाठी झाली पुरुष

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री एलन पेजने शस्त्रक्रिया करुन लिंगबदल केला आहे. आपल्या पत्नीसाठी तिने पुरुष लिंग स्विकारले आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आता माझं नाव अॅलन नसून एलियॉट पेज आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. अशा आशयाची पोस्ट तिने लिहली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एलन आता यापुढे अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार नाही. कारण तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारलं आहे. लहानपणापासून मला पुरुषांपेक्षा स्त्रियांप्रती जास्त आकर्षण होतं. त्यामुळे मी ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका देखील केली असल्याचे तिने सांगितले आहे.

कोण आहे एलन पेज?
एलन पेज ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजवर एक्स मेन, इन टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळे तिने हॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:च असं एक वेगळ स्थान प्रस्थापित केलं आहे.

एलन गेली तीन वर्ष एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच तिने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असं तिनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर तिने ही शस्त्रक्रिया एमासाठीच केली अशी चर्चा आहे.