मोठी बातमी : सुशांतसिंगला ड्रग्स पुरवणाऱ्याला एनसीबीकडून अटक
मनोरंजन

मोठी बातमी : सुशांतसिंगला ड्रग्स पुरवणाऱ्याला एनसीबीकडून अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवाठा करणाऱ्या पेडलरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गोव्यात अंमली पदार्थविरोधी अभियान राबवून अटक केली. २ परदेशीयांसह ३ जणांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला ड्रग्ज पुरवत होता. एनसीबीच्या पथकाने ७ आणि ८ मार्चला गोव्यातील विविध ठिकाणी छापा टाकला, त्यानंतर तिन्ही आरोपींना पकडण्यात एनसीबीला यश आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

छापेमारीदरम्यान 41 बोल्ट, 22 ग्राम कोकीन, 28 ग्राम चरस, 1 किलो पेक्षा अधिक गांजा, 150 ग्राम सफेद पावडर सहीत 10 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हेमंत साहा या मोठ्या ड्रग माफियाला अटक करण्यात एनसीबी पथकाला यश आलं आहे. हा ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात लोकांना ड्रग्ज पुरवायचा. त्यासोबतच हेमंतनं सुशांतसिंग राजपूतला अनेक वेळा ड्रग्जचा पुरवठा देखील केला होता. एनसीबीची टीम आता परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहे.तसचं अटक करण्यात आलेल्या लोकांची सखोल चौकशी देखील केली जातेय.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली. वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला. सुरुवातीच्या तपासणीत असं दिसून आलं आहे की, सुशांतनं नैराश्यात येऊन आत्महत्या केली. मात्र, यानंतर सुशांतच्या कुटुंबीयानं सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयने एनसीबीच्या सहकार्याने अनेक खुलासे देखील केले. सीबीआयने एनसीबीसोबत एकत्र येऊन घटनेशी संबंधित अनेक महत्वाची माहिती दिली.