सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यात सात जिल्ह्यांत रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

थोरात म्हणाले, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

ते सात जिल्हे खालीलप्रमाणे
1) बीड
2) औरंगाबाद
3) नांदेड
4) सोलापूर
5) सातारा
6) धुळे
7) अहमदनगर

२६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.