आयुषमानच्या ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री
मनोरंजन

आयुषमानच्या ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुषमानसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून आयुषमानच्या डॉक्टर जी या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. आता या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. रकुल प्रीत सिंग आणि आयुषमान खुराना डॉक्टर जी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉक्टर जी हा चित्रपट एका कॉमेडी ड्रामा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूति कश्यप करणार आहे. चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स करणार आहे. रकुल या चित्रपटात वैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थिनी डॉ. फातिमाची भूमिका साकारणार आहे. तर आयुषमान डॉ. उदय गुप्ता म्हणजेच रकूलच्या सिनीयर डॉक्टरची भूमिका साकारणार आहे.

आयुषमान खुराना हा सतत चर्चेत असतो. गेल्या वर्षी आयुषमानने जंगली पिक्चर्स केला होता. आता आयुषमान खुराना ‘डॉक्टर जी’ दुसरा चित्रपट करणार आहे.