मानसीने नवऱ्यांसाठी घेतला भन्नाट उखाणा
मनोरंजन

मानसीने नवऱ्यांसाठी घेतला भन्नाट उखाणा

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली. मानसीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मानसी प्रदीपच्या गावी फरीदाबादला गेली होती. आता ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत उखाणा घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंदिरात वाहते फुल आणि पान, प्रदीप रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान असा उखाणा मानसीने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत घेतला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मानसीने लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. यापूर्वी मानसीच्या आईने उखाणा घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. खुद्द मानसीने आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले.