अभिज्ञा भावे अडकणार लग्नाच्या बेडीत; उद्योजकाशी बांधणार लग्नगाठ
मनोरंजन

अभिज्ञा भावे अडकणार लग्नाच्या बेडीत; उद्योजकाशी बांधणार लग्नगाठ

मुंबई : मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिज्ञाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मेहुल पै या उद्योजकाशी ती लग्नगाठ बांधणार असून तिच्या हातावर मेहुलच्या नावाची मेहंदी लावण्यात आली आहे. मेहंदीच्या कार्यक्रमाला मराठी कलाविश्वातील अभिज्ञाच्या मित्रमैत्रिणींनीही हजेरी लावली. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या कार्यक्रमाचे काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेहुल आणि अभिज्ञा यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालं. गेल्या पंधरा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे. २०१४ मध्ये अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा मेहुल आणि अभिज्ञा संपर्कात आले. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि आता दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये मेहुल आणि अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला. या छोटेखानी समारंभाला फक्त कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती. येत्या सात जानेवारी रोजी हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.