लष्कर-ए-मुस्तफाच्या म्होरक्याला अटक; जम्मू व अनंतनाग पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देश बातमी

लष्कर-ए-मुस्तफाच्या म्होरक्याला अटक; जम्मू व अनंतनाग पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अनंतनाग : लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात जम्मू व अनंतनाग पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहीमेत त्याला जम्मू येथून अटक केली गेली. यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काश्मीर घाटीत सक्रीय असेलली लष्कर-ए-मुस्तफा ही जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचाच भाग आहे. जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी याबाबत सांगितले की, जम्मूमधील कुंजवानी जवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अटकेची कारवाई करतेवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.

हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची त्याची योजना होती.