मराठी अभिनेत्रीचं हॉट बिकिनी फोटोशूट; पाहा तिच्या अदा
मनोरंजन

मराठी अभिनेत्रीचं हॉट बिकिनी फोटोशूट; पाहा तिच्या अदा

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री प्राजक्ता शिंदेचा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी मराठी चित्रपटाचं नाव इमेल-फिमेल असं आहे. तत्पूर्वी तिने काही खास फोटो इन्स्टाग्रमावर पोस्ट केले असून सोशल मीडियावर सध्या या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या वर्षी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेला. या चित्रपटाच्या माध्यमातून प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.