सारा अली खानने शेअर केला विजय देवरकोंडासोबतचा सेल्फी; तर्कवितर्कांना उधान
मनोरंजन

सारा अली खानने शेअर केला विजय देवरकोंडासोबतचा सेल्फी; तर्कवितर्कांना उधान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच साराने याला एक ‘फॅन मोमेंट’ असे संबोधले आहेफोटो पाहून चाहत्यांनी वेगळेच तर्कवितर्क लावायला सुरूवात केली. या फोटोत विजयने ग्रे रंगाचा टी-शर्ट घातला आहे, तर सारा ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या फोटोमागचे कारण आता समोर आले आहे. विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा आगामी चित्रपट लायगरमधून एन्ट्री करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे झळकणार आहे. विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/CLIr_uhhFMT/?utm_source=ig_web_copy_link

विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने साराने पहिल्यांदाच विजयची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून त्यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सारा आणि विजय यांची जोडी परफेक्‍ट असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ‘अर्जुन रेड्‌डी’ चित्रपटानंतर विजय देवरकोंडाला खूपच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

https://www.instagram.com/p/CJ_G-b9pD7B/?utm_source=ig_web_copy_link

सारा अली खानचा कुली नंबर १ चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. याशिवाय ती ‘अतरंगी रे’मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारत आहे. तर ‘अर्जुन रेड्‌डी’ चित्रपटानंतर विजय देवरकोंडाला खूपच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.