मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन
मनोरंजन

मोती स्नानाची वेळ झाली म्हणणाऱ्या आजोबांचे निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली… या जाहिरातीतील अलार्म काका म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे. विद्याधर करमरकर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जिया, सास बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे. फक्त चित्रपट नव्हे तर त्यांच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या.

दरवर्षी दिवाळीदरम्यान टीव्हीवर प्रसिद्ध होणारी उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली… ही मोती साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी अलार्म काकांची भूमिका साकारली होती.