धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू
मनोरंजन

धक्कादायक ! शूटिंगला गेलेल्या अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

तिरुवनंतपुरम : मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगाड यांचा केरळमध्ये एका फिल्मच्या शूटिंगसाठी ते गेले असता धरणात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल थोडुपुझात एका फिल्मच्या शूटिंगसाठी आले होते. शुक्रवारी ते मलांकारा धरणावर गेले होते. मित्रांसोबत या धरणाच्या पाण्यात ते अंघोळीसाठी उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मल्याळम सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. पापम चेय्याथावर कल्लेरियाट्टे या फिल्ममध्ये ते शेवटचे दिसले होते. याच वर्षात फेब्रुवारीमध्ये ही फिल्म रिलीज झाली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

अनिल यांनी अय्याप्पनम कोशियम कामाट्टीपदम आणि पावडा या फिल्मध्ये अभिनय केला होता. त्यातून त्यांना ओळख मिळाली होती. ते टीव्ही अँकरही होते. निर्माते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 2014 साली ते सिल्व्हर स्क्रिनवर झळकले होते.