फरहान अख्तरच्या तूफानचं पोस्टर रिलीज
मनोरंजन

फरहान अख्तरच्या तूफानचं पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरच्या तूफान चित्रपटाचं रोमॅण्टिक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमधून त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची देखील घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/FarOutAkhtar/status/1409791488150716420

अभिनेता फरहान अख्तर याने स्वतःच्या त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता फरहानचे दोन वेगवेगळे लूक पहायला मिळतात. पहिल्या रोमॅण्टिक पोस्टरमध्ये फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर दिसून येत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग करताना दिसून येत आहे.

तूफानसाठी चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तूफानचा तूफानी ट्रेलर 30 जूनला प्रदर्शित होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत. तूफान भारतासह 240 देश व प्रदेशांमध्ये 16 जुलैला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.