मनोरंजन

‘ट्विंकल बॉम्ब’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सची ट्विंकलने केली बोलती बंद; म्हणाली

अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा आज डिजिटली रिलीज झाला. पण रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाचे नाव आणि कथेवरून लोकांनी या सिनेमावरून प्रचंड राडा घालत सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला ट्रोल केले जात असताना आता त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका व्यक्तीने फोटोशॉप्डद्वारे ट्विंकल खन्नाचा फोटो ‘लक्ष्मी’च्या पोस्टरवर एडीट केला आणि त्याला ‘ट्विंकल बॉम्ब’ असे टायटल दिले. हा फोटो पाहिल्यानंतर ट्विंकलने मीम शेअर करत आपला संताप व्यक्त केला. हा फोटो शेअर करत ट्विंकलने म्हंटले आहे की, ‘एका ब्लॉगसाठी फोटो शोधत असताना माझी नजर या फोटोवर गेली. रिपोस्ट करण्यापेक्षा मी तो क्रॉप करुन शेअर करत आहे. तुम्ही देवाला थट्टेचा विषय बनवले, तू आमच्या देवावर विनोद केलास,तू एक थर्ड क्लास व्यक्ति आहेस, असे एका जणाने मला म्हटले. यावर मी त्याला उत्तर दिले की, देवाला खरोखर विनोद आवडत असतील. असे नसते तर त्याने तुला (ट्रोलर) का बनवले असते?” असे तिने म्हंटले आहे.

ट्विंकल खन्ना सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची लेक आहे. अभिनयात फारसे यश मिळवता आले नसले तरी ती एक चांगली लेखिका आहे. ट्विंकलने मेला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. असूनही तिला अभिनयक्षेत्रात फार यश कमावता आले नाही. ट्विंकल खन्नाने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बादशहा, मेला सारख्या चित्रपटात काम केले आहे.

याशिवाय ट्विंकलच्या मिसेस फनी बोन्स, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि पायजमाज आर फॉरगिव्हन या पुस्तकांना वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आता ती तिच्या चौथ्या पुस्तकाच्या लिखाणात व्यग्र आहे. ट्विंकल तिच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखली जाते.

आधी अक्षयच्या या सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ होते. या टायटलला प्रचंड विरोध झाल्यानंतर मेकर्सनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे टायटल बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे टायटल दिले. पण या नव्या टायटलवरही नेटकरी समाधानी नाहीत. केवळ ‘बॉम्ब’ हटवले, मात्र ‘लक्ष्मी’ तसेच कायम ठेवले. सिनेमाच्या टायटलचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नसताना हे नाव दिले गेले, हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असे नेटक-यांनी म्हटले आहे. आम्हाला ना ‘लक्ष्मी बॉम्ब’ नाव हवे, ना ‘लक्ष्मी’ अशी मागणी नेटक-यांनी केली आहे.