मुलीसोबत डान्स करतानाचा गोविंदाचा व्हिडीओ होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का
मनोरंजन

मुलीसोबत डान्स करतानाचा गोविंदाचा व्हिडीओ होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का

बॉलिवूडचा हिरो नंबर वन अभिनेता गोविंदा अनेक दिवसांनी सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह झाला आहे. गोविंदाने यादरम्यान डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो लेक नर्मदा आहुजासोबत डान्स करताना दिसतो आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपले आढळ स्थान निर्माण करणारा गोविंदा सध्या सिनेइंडस्ट्रीपासून भलेही दूर असला तरी तो सोशल मिडीयावर खूप अॅक्टिव्ह असतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोविंदा अभिनयासोबत डान्स आणि कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असलेल्या गोविंदाने त्याच्या मुलीसोबत डान्स करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या मुलीचे नाव टिना आहुजा असे आहे. बाप-लेकीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नर्मदा वडिलांना कॉपी करताना दिसत आहे. यात दोघा बाप लेकीचे एक्सप्रेशन अग्गदी पाहण्यासारखे आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिक वेळा पहिला गेला आहे.
गोविंदाने १९८०च्या दशकात एक्शन आणि डान्सिंग हिरोच्या रुपात करिअरची सुरूवात केली. ९०च्या दशकात तो विनोदी अभिनेता म्हणून नावारुपास आला.

https://www.instagram.com/p/CLzBVpchpiC/?utm_source=ig_web_copy_link

गोविंदासोबतच अभिनेत्री नीलमनेदेखील 80 च्या दशकात बॉलिवूड करिअर सुरू केले होते. चित्रपटांत एकत्र काम करताना गोविंदाचे नीलमवर प्रेम जडले होते असे म्हणतात. एंटरटेनमेंट पोर्टल पिंकविलामधील एका रिपोर्टनुसार गोविंदाला नीलमबरोबर लग्न करायचे होते. पण गोविंदाच्या आईला त्याने डायरेक्टर आनंद सिंह यांची साली म्हणजे सुनिता ( गोविंदाची पत्नी) बरोबर लग्न करावे असे वाटत होते. आईचे म्हणणे गोविंदा कधीही टाळू शकत नव्हता, त्यामुळे त्याने नीलमऐवजी सुनिताशी लग्न केले. गोविंदाने कधीही नीलमवर असलेले त्याचे प्रेम व्यक्त केले नाही, किंवा ते कधी समोरही आले नाही.

‘इल्जाम’ (1986) गोविंदाचा पहिला चित्रपट होता. त्यात नीलम त्याची कोस्टार होती. गोविंदा जेव्हा पहिल्यांदा नीलमला भेटला तेव्हा तिचा साधेपणा त्याला एवढा आवडला होता की, त्याने नीलमचा पहिला चित्रपट ‘जवानी’ (1984) अनेक वेळा पाहिला होता. नीलमला वारंवार पाहण्यासाठी त्याने असे केले होते गोविंदा आणि नीलम ने फिल्म ‘लव 86’ (1986), ‘खुदगर्ज’ (1987), ‘सिंदूर’ (1987), ‘हत्या’ (1988), ‘घराना’ (1989), ‘दोस्त गरीबों का’ (1989), ‘दो कैदी’ (1989), ‘फर्ज की जंग’ (1989), ‘बिल्लू बादशाह’ (1989), ‘ताकतवर’ (1989), ‘जोरदार’ (1996) मध्ये सोबत काम केले होते.