भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
मनोरंजन

भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

नवी दिल्ली :  भजन गायक नरेंद्र चंचल आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे नरेंद्र चंचल घराघरात पोहोचले होते. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. ते विशेषतः भजन गीतासाठी परिचित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. तर ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणंही त्यांचं प्रसिद्ध झालं. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी हिंदी, पंजाबी सिनेमात अनेक गाणी गायली.

दरम्यान, मार्च 2020मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते कोरोनावरील गाणं गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणं गाताना ते व्हिडीओत दिसले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई नावाचं गाणं गायलं होतं. याशिवाय त्यांनी 1980 मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, 1983 मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत.