फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट
लाइफफंडा

फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेल सुरु; स्मार्टफोन खरेदीवर मिळतेय आकर्षक सूट

नवी दिल्ली : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आजपासून Flipkart Realme Days Sale ला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस म्हणजे ९ जानेवारी पर्यंत हा सेल चालणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
या सेलमध्ये Realme X3 आणि Narzo 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज सेल २०२१ मध्ये रियलमी ६ स्मार्टफोनवर १६ टक्के सूट मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रियलमी एक्स ५० ५जी ला ३१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर तसेच ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. रियलमी सी १२ ला ८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर, रियलमी ७, ७ प्रो आणि रियलमी ७ आय वर अनुक्रमे १६ टक्के, ४ टक्के, आणि १३ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

याशिवाय रियलमी सी १५ एसला १६ टक्क्यांच्या सूटसोबत खरेदी करता येवू शकते. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये रियलमी सी ११ ला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या सेलमध्ये रियलमी नार्जो २० सीरीजच्या स्मार्टफोन्सवर रियलमी नार्जो २०, नार्जो २० ए, नार्जो २० प्रो वर अनुक्रमे १० हजार ४९९ रुपये, ८ हजार ४९९ रुपये आणि १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.