स्मार्ट वॉच खरेदी करायचाय? मग ‘हे’ स्मार्ट वॉच एकदा पहाच; तेही तुमच्या बजेटमध्ये
लाइफफंडा

स्मार्ट वॉच खरेदी करायचाय? मग ‘हे’ स्मार्ट वॉच एकदा पहाच; तेही तुमच्या बजेटमध्ये

नवी दिल्ली : मार्केटमध्ये सध्या अनेक स्मार्ट वॉच आणि फिटनेस ब्रँड मोठ्या प्रमाणात लाँच करण्यात येत आहेत. अॅपल किंवा सॅमसंग पासून अन्य मोठ्या कंपन्यांच्या महाग स्मार्ट वॉच आहेत. मात्र आता बेस्ट स्मार्ट वॉच खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. कारण मार्केटमध्ये ३ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या अनेक स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Amazfit Neo Smart Watch
हे मॉडल नवीन असून हे स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँडसाठी ही कंपनी ओळखली जाते. कंपनीच्या स्मार्ट वॉचला ३ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी खरता येवू शकते. रेट्रो डिझाइनचे असून याची बॅटरी बॅकअप २८ दिवसांपर्यंत आहे. ब्लॅक अँड व्हाइट डिस्प्ले आहे. परंतु, स्मार्ट वॉचचे सर्व फीचर्स यात आहेत. वॉटर प्रूफ आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले आहे. हार्ट रेट मॉनिटर आहे, स्लीप मॉनिटर आहे. फोनने कनेक्ट करून मेसेज आणि ईमेल पाहू शकता.

Amazfit Bip
या स्मार्ट वॉचला सिंगल चार्ज करून एक महिन्यांपर्यंत चालवू शकता येते. या सेगमेंटमध्ये ही स्मार्टवॉच जबरदस्त वॉचपैकी एक आहे. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे. यात हार्ट रेट मॉनिटर सह अन्य सॉफ्टवेयर बेस्ड फिटनेस मोड्स दिले आहेत. वॉटर रेजिस्टेंट आहे. फोनच्या नोटिफिकेशन्स दिसतील. यात वॉच टच स्क्रीन आहे.

Noise colorfit Pro
१.३ इंचाची कलर डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्ट वॉचची डिझाइन अॅपल वॉचसारखी आहे. या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम आहे. जे रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर करतात. ही फुल टच स्क्रीन आहे. यात फिटनेसच्या अनेक मोड्स मिळतात. १० दिवसांपर्यंत बॅटरी बॅक अप देवू शकते. या स्मार्ट वॉचला ३ हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येवू शकते. असा दावाही कंपनीने केला आहे.

Realme Watch
या स्मार्टवॉचला ऑनलाइन रिटेल स्टोर्सवरून ऑफरमध्ये खरेदी करण्यासाठी ३ हजार रुपये मोजावे लागतात. या स्मार्ट वॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ऑक्सिजन लेवल मॉनिटर मिळते. जे महागड्या स्मार्टवॉचमध्ये मिळते. हार्ट रेट मॉनिटर, फिटनेस मोड पासून अनेक फीचर्स मिळते.

Gionee Smart life
या वॉटर प्रूफ स्मार्ट वॉचला सुद्धा ३ हजार रुपयांच्या कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. यात कॅलरी मीटर, हार्ट रेट मॉनिटर आणि टच स्क्रीन सारखे फीचर्स दिले आहेत. ही आहे. यात फीटनेस संबंधी अनेक मोड्स जोडलेले आहेत. या वॉचचा डायल स्टेनलेस स्टील दिला आहे.