भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूचा भाजपात प्रवेश
राजकारण

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूचा भाजपात प्रवेश

तमिळनाडू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आणि तामीळनाडू भाजपा अध्यक्ष एल मुरुगन यांच्या उपस्थितीमध्ये शिवरामाकृष्णन यांनी चेन्नईत भाजपामध्ये प्रवेश केला. तमिळनाडूमध्ये भाजपा पक्ष आधिक मजबूत करण्यासाठी शिवरामाकृष्णन पक्षाला मजबूत करण्याचं काम करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांच्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम गंभीर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधनासभामध्ये निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, लक्ष्मण शिवरामाकृष्ण यांनी १७ व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. शिवरामाकृष्ण यांनी भारतीय संघाकडून नऊ कसोटी सामने, २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

शिवरामाकृष्णन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फक्त चार वर्षच होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शिवरामाकृष्ण यांनी 76 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 154 विकेट घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शिवरामाकृष्णन यांनी समालोचन म्हणून काम केलं आहे. 1983 मध्ये पहिला सामना खेळल्यानंतर शिवरामकृष्णनला फारशी संधी मिळाली नव्हती, त्यानंतर 1987 मध्ये ते निवृत्त झाले. मग समालोचक म्हणून त्यांनी जगभरात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.

तर, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा यापूर्वीही बर्‍याचदा झाल्या होत्या. एवढचं नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा रंगली होती. पण रजनीकांत यांनी मोठी घोषणा करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.