शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियानाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. मात्र काही अज्ञातांनी पंजाबमधील जिओच्या जवळपास 1500 हून अधिक टॉवरची तोडफोड केल्या मुळे कंपनीला प्रचंड नुकसान झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्या कृषी कायद्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना सर्वाधिक फायदा होईल असा प्रचार आंदोलक शेतकऱ्यांमध्ये केला जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये या दोन्ही कंपन्यांना मोठा विरोध होत आहे. पंजाबमध्ये जिओचे जवळपास नऊ हजार टॉवर्स आहेत. यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायरी अज्ञातांनी कापल्या आहेत. तर जीओच्या काही टॉवर्सची तोडफोड तर काही टॉवर्सचं वीज कनेक्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे जीओच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यावरुन रिलायन्स जिओने पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची आणि रोखण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचा रिलायन्सविरोधात राग उफाळून आला आहे. वीज कनेक्शन बंद करणे, टॉवरची केबल कापण्याचे प्रकार होत आहेत. इतकेच नव्हे तर काही शेतकऱ्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी ग्रुप्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही केलं आहे. याचाच राग मुकेश अंबानी यांच्या जिओ मोबाइल टॉवरवर निघत असून पंजाबच्या अनेक भागात टॉवर बंद पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले गेले आहेत.

”राज्यात मोबाइल टॉवरची तोडफोड आणि दूरसंचार सेवांमध्ये अडथळा आणू नये अन्यथा पोलिस याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. तसेच, संपर्क माध्यमांना तोडल्यानं विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. सध्या विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. याशिवाय कोरोनामुळे अनेक लोक घरातून काम करत असून दूरसंचार सेवा खंडीत झाल्यानं त्यावर परिणाम होत आहे. एवढंच नाही तर बँकिंग सेवासुद्धा यामुळे बंद राहिल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं