शिवमोगामध्ये स्फोट; ८ जणांचा मृत्यू
देश बातमी

शिवमोगामध्ये स्फोट; ८ जणांचा मृत्यू

बंगळुरू : कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला. दगडखाणीजवळ एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला आहे. या ट्रकमधून काही जण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते. शिवाय स्फोटाची तिव्रताही मोठी होती. त्यामुळे आजू-बाजूच्या घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तर अनेकांना भूकंप झाला असं वाटलं त्यामुळे अनेक नागरिक आपल्या घरातून बाहेर निघाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शिवमोगा हा जिल्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा आहे. स्फोटकं ट्रकमध्ये होती की ट्रकच्या बाजुला याचा शोध अद्याप सुरू असल्याचं एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी म्हटलं आहे.

याप्रकणी राज्य सरकार पीडितांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘या दुर्घटनेबद्दल ऐकून प्रचंड वेदना झाल्या. पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’ असं ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला.