दिवसभराच काम संपवून ‘ती’ हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेली होती, आणि…
बातमी मुंबई

दिवसभराच काम संपवून ‘ती’ हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेली होती, आणि…

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिला अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री हॉटेलमध्ये एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राहत होती. तिचं दिवसभरातील चित्रीकरण संपवून अभिनेत्री हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी पीडित गेली होती. त्यावेळी अचानक आरोपी दिलेश्वर महंत (वय- २२) याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवले. आरोपीच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वतःची सुटका करुन घेतली.

त्यानंतर आरोपी महंतला हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी रविवारी अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे.